Friday, April 24, 2009

प्रेम कर भिल्लासा्रखं...

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं......

प्रिये तुझ्या आठवणीत ...

प्रिये तुझ्या आठवणीत
मला चार टाके पडले रक्त वाया न घालवता
मी त्यानेच प्रेमप्रत्र खरडले

या सगळ्यात डोक्टरने मात्र चारशे रुपये लाटले

प्रिये मी सारचं वसुल करणार आहे
पण त्याआधी तुझ्या आठवणीत
मी एक झाड लावणार आहे

तु माझी झालीस की त्या झाडाची
गोड गोड फळ मी चाखणार आहे

पण तु माझी झाली नाहीस तर ते झाड
मी कापुण माझे चारशे रुपये वसुल करणार आहे

प्रिये तुझ्या आठवणीत मी एक प्रेमप्रत्र लिहणार आहे
त्यासाठीआभाळाचा कागद
अन समुद्राची शाई मी वापरणार आहे

तुझा नकार असेल तर माझा
कागद मला परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे

प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही

तुझ्या आठवणींची आठवण येणार आहे
थोडा वेळ दुखः व्यक्त करणार आहे

अन ,
लगेच दुसरीच्या शोधात फिरणार आहे ...

मैत्रि ...

एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नस्लेच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच...

मैत्रीण ....

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

Tuesday, April 21, 2009

प्रेम...

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...

म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! अजुन वेळ गेलेली नाही .. काही तरी कर

Friday, April 17, 2009

आवडत मला...

आवडत मला...
सायंकाळी समुद्र किनारी फ़िरायला
ओल्या वाळू वर अलगदपणे
पावलं टाकायला...............
खुप मज्जा येते ज्या
वेळी ती ओली वाळू
तळपायांना हळूवार स्पर्श करते.
आवडत मला...
त्याच वाळूवर काही
वेळ बसुन त्या मावळत्या
सुर्याकडे एकटक बघत बसायला.
आवडत मला ...
त्या समद्रात बुडणारया
सुर्याकडे पहात पहात
गेलेले दिवस आठवत बसणे.
आवडत मला...
बुडलेल्या सुर्याला
पाहता पाहता
ऊद्या च्या नविन
किरणांची वाट पाहायला

प्रेमात पडलं की..

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

तिचं बोलण,
तिचं हसण;
जवळपास नसूनही
जवळ असण;
जिवणीशी खेळ करीत
खोटं रूसण;
अचानक स्वप्नात दिसण!

खट्याळ पावसात
चिंब न्हायच!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

केसांची बट तिने
हलूच मागे सारली...
डावा हात होता
की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण
मनात आपल्या साठवतो!

ती रुमाल विसरून गेली!
विसरून गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण
मनात आपल्या साठवतो!

आठवणीचं चांदण असं
झेलून घ्यायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

तिची वाट बघत आपण उभे असतो...
ठरलेली वेळ कधीच टळलेली!
येरझारा घालणसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर!
सगल्यांची नजर असते
आपल्यावरच खिळलेली!!

माणसं येतात,
माणसं जातात,
आपल्याकडे संशयाने
रोखून बघतात!

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वास:
एक तास! चक्क अगदी एक तास!!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते!
अखेर ती उगवते!!

इतकी सहज! इतकी शांत!
चलबिचल मुळीच नाही!
ठरलेल्या वेलेआधीच
आली होती जशी काही!!

मग तिचा मंजूळ प्रश्न:
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तर:
"नुकताच ग! तुझ्याआधी काही क्षण!"

कालावर मात अशी!
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

एकच वचन
कितीदा देतो आपण!
एकच शपथ
कितीदा घेतो आपण!

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात!
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात!!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजुक गत
आपल्या मनात वाजू लागते!!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरून जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असण सुगंधाने भरुन जातं!!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधलून द्यायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!

-मंगेश पाडगावकर

बरंच काही....

बरंच काही निघून गेलयं
तरीही मी उभाच आहे
अर्थ सर्वच संपून गेलाय
तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली
मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा
हाती काहीच उरले नाही


आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तसं

तरीही,

बरंच काही शिल्लक आहे
अजून माझ्या हाती
काही क्षण अजूनही आहेत
फक्त माझ्यासाठी

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी
माझ्याकडची हरलो
प्रत्येक क्षणी आजही मी
फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त
सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या क्षणीही
तुझी उणीव भासतेय
फक्त तुझीच उणीव भासतेय

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...