Tuesday, June 30, 2009

आठवण...

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

www.majhyakavita,com

बघ माझी आठवण येते का?

"मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?"

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

एक मुलगी मला आवडली...

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु...?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु...

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास...

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .

भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .

तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .

माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .

Monday, June 29, 2009

आमची कंपनी

आमच्या Software कंपनीची
बातच काही और आहे
येथे दिवसाचाही दिवस
आनी रात्रीचाही दिवस आहे

सकाळी सकाळी येथे
कामाचा श्रीगणेशा होतो
जरा उशीर झाल्यावर मात्र
मुंबईसारखा एक बोम्बस्फ़ोट होतो

बोनसचा वादा नेहमी येथे
क्षनात विसरला जातो
वाढदिवस सर्वांचा मात्र
आठवनीने साजरा होतो

दर दोन महिन्यांनी येथे
नव्या जागेच्या स्वप्नाची असते खिरापत
सोडुन कुनी गेल्यावर मात्र
होते Increment चे वाटप..

चहा Cofee च्या नावाने येथे
ज्युस झुरळाचा पाजला जातो
टी-मशिन स्वच्छ करनारा मात्र
वर्षातुन एकदाच बोलावला जातो
बाथरूम मध्ये झोपन्याची
येथे मजाच काही और आहे
बाथरूम कम मोबईल रूम
येथे नेहमीच एंगेज आहे

बाथरूम मध्ये जाण्यासाठी येथे
नशीब जोरावर असावं लागतं
दरवाजा Lock झाल्यावर मात्र
गाडीच्या चाबीनेच उघडावं लागतं

लंच नंतर येथे चहाचा
वेध सुरु होतो
चहावाला वेळेवर मात्र
रोज देवासारखा येतो
प्रत्येक जन येथला
रात्री उशीराच घरी जातो
बायको पोरं झोपल्यावर
एकटाच जेवन घेतो

बायका मुलांना यांचे
दर्शन कधी होत नाही
मुले विचारतात आईला
पप्पा नेहमी घरी कसे दिसत नाही ?

Monday, June 22, 2009

मैत्रिण

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.

चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.

आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.

कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी।

हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.

नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्करावी.

सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.

लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.

ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.

सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.

बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.

परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.

थोडा वेळ मग ती शांत रहावी,
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...