Tuesday, January 26, 2010

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची...

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची
तिच्या मनातल सगळच मला सांगायची

सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल
तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल

पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन
बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन

ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत
म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत

नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण
हे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत
म्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होत

ती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरली
तेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरली
एकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होता
आणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता

"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली"
"खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"
न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडल
आणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल


Monday, January 25, 2010

मैत्री म्हणजे ...

ध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....
हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....
मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......
मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोष्ट !......

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी.........
इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....

Wednesday, January 6, 2010

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

- कुसुमाग्रज

Tuesday, January 5, 2010

धागे …

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल

प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे

मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु

सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम

मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती

मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी

एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला

सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते

थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख

मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे

अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही

महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला

साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत  

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...