Sunday, May 30, 2010

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात...

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

कधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून...
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...

एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,
समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..
जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची काळजी करत बसतात..
कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात


पण आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..
मग फोनवर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात...
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत..
आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..
तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात...
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशीबोलतात

ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो..
तो ही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो..
कारण त्याला माहित असत..
फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो...
त्याच्याइतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत ..
मग जोडीदाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात..
कारण आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

त्याच्यासाठी कधी कधी ती हि कासावीस होते...
विसरविसर म्हणता म्हणता त्याचीच होऊन राहते..
पण तिच्या भावना ती शब्दात कधीच मांडत नाही..
आणि तोहि बोलताना तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..
अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून घेतात..
जेव्हा आज ते कधीकधी एकमेकांशी बोलतात


दूर जाताना दिलेलं मैत्रीचं वचन ते अस नेहमीच पाळतात..
आणि म्हणूनच आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात...

Sunday, May 23, 2010

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडलं..........

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेल मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेल म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेल मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारण .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

Tuesday, May 4, 2010

तुझे माझे नाते

तुझे माझे नाते आता मलाच कळत नाही....
शब्दात पकडू म्हणले तर शब्दच मला कळत नाहीत...
प्रत्येक तास, प्रत्येक मिनट...
आता फ़क्त विरहाचाच आठवतो....

विसरुन जाउ म्हणले तर अश्रु बनुन ओघळतो....
तुझा भास आता जाणवत रहातो मनाच्या प्रदेशात....
पकडू म्हणले तर सगळा प्रदेश उजाड दिसतो....

आता फ़क्त मी तुझ्यासाठी एक दिवा लावू शकतो...
आणि विझताना त्या दिव्यात आपले प्रेम बघु शकतो