Monday, February 14, 2011

सखी

सखी तू मोगर्‍याची दरवळ मनभर,
कधी पास कधि भास,क्षणोक्षण रोमांचित..............

सखी तू प्राजक्ताचा मोहमयी सडा,
ओंजळीत साठलेला स्वप्नचांदणचुरा..................

सखी तू ग्रिष्माचा बहर बहावा,
जगण्याच्या ऊर्मिचा उन्मेष आगळा................

मध्यन्ही डोलणारा तू शिरिष डोलारा,
तळपत्या वाटेवर मायेचा विसावा.................

गच्च-रानी फुललेली उक्षीची तू वेल,
मनातला खोलवर स्नेहाचा पाझर.................

फुलाकळ्यांचा लोभसवाणा सखी बहर हा तुझा,
रंग-गंध त्यांतले वेचणारा मी कवी वेडा.................

Friend


Thursday, February 10, 2011

चंद्र

18332_327159804851_707964851_4920546_3898071_n

आपण सारे अर्जुन…

संसार खरंच इतका अवघड आहे का?

माणसाला नेमकं काय हवंय?
संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का?
एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का?

आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार हा असाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली 'एंट्री' मध्येच केव्हातरी होते आणि 'एक्झिट'ही.
हे नाटक किती वर्षांचं, ते माहित नाही. चाळीशी, पन्नाशी, साठी, सत्तरी .... सगळं अज्ञात. घडधाकट भूमिका मिळणार, की जन्मांधळेपणा, अपंगत्व;
बुद्धीचं वरदान लाभणार की मतिमंद?
भूमिकाही माहित नाही.

तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा ... किती सांगावं?
कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं;
पण ह्या सहा छिद्रांतून संगीत बाहेर येत नाही.
षड्रिपूंचेच अवतार प्रकट होतात.

स्वत:ला काही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही.
तरी माणसं संसार समजू शकत नाहीत.

"आपण सारे अर्जुनच."

life-purpose

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का...

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसावशील का ?

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या
जीवन मार्गावर आणशील का?

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छापूर्ती
तू पुढे येशील का?

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?

माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

 

a-walk-to-remember

Tuesday, February 1, 2011

प्रेमात पडल्यासारखं वाटतं....

वाऱ्याच्या तालावर केस तुझे नाचताना
माझ्यातलं प्रेम गीत गायल्यासारखं वाटतं

तुझ्याबरोबर आज जे जगतो ते जीवन
मी स्वप्नात कधीतरी पाहिल्यासारखं वाटतं

संध्याकाळी तुला हसताना पाहिल्यावर
दिवसभराचं दु:ख हरवल्यासारखं वाटतं

मी घेऊन येतो फूल तुझ्यासाठी, पण
तुला पाहून फूल लाजल्यासारखं वाटतं

तुझा हात हातात घेऊन चालताना
हे जीवन जगल्यासारखं वाटतं

मिठीत तुझ्या मी विरघळताना
मला घर सापडल्यासारखं वाटतं

वारा तुझ्या अत्तराचा सुगंध घेऊन आला की
पून्हा तुझ्या प्रेमात पडल्यासारखं वाटतं

तू हसून, मला 'वेडा' म्हणालीस की
मी फक्त तुझाच असल्यासारखं वाटतं

तुझ्या डोळ्यातून स्वत:ला पाहताना
मला उगीच 'महान' झाल्यासारखं वाटतं

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...