Saturday, April 30, 2011

मिठीत यायचं तर अशी ये

मिठीत यायचं तर अशी ये
की दुजेपणाच भान सुटावं
सुप्त मनाच्या वादळातुन
फक्त श्वासांचं रान उठावं

मिठीत यायचं तर अशी ये
की मनानं मनात विरून जावं
माझ्या श्वासाने जरा थांबुन
तुझ्या श्वासात जगुनं घ्यावं

मिठीत यायचं तर अशी ये
की अस्तित्वानं दडून जावं
नेणिवेच्या धुक्यावरती
जाणिवेनं पडून रहावं

मिठीत यायचं तर अशी ये
की क्षणांनी स्तब्ध व्हावं
खोल मनाच्या गाभा-यातुन
आत्म्यानं मुक्त हुंकारावं !!

young_couple_-_love_blog_0

स्वर टिपेचा

स्वर टिपेचा आज वेचा ! रे उद्या, फुटणार काचा !
जायचे जातील ! पाहू सोहळा ; उरतील त्यांचा !

विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या.
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा !

देहही नव्हता तपस्वी , जीवही नव्हता कलंदर…
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा…

संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी,
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर ; पावसाचा !!!

मी म्हणालो बायकोला

मी म्हणालो बायकोला, आजपासून प्रेयसी तू
ती म्हणाली, यापुढे चोरून भेटू

मी किनार्‍याचा तिला पत्ता दिला
ती बिचारी खरकटी उरकून आली

मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या
ती म्हणाली, दूध हे जाते उतू

ती म्हणाली आठवा वर्षे जुनी
मी म्हणालो, काळ सारा गोठला

रूम मित्राने दिली एकांत रात्री
ती म्हणाली राहिली पोरे उपाशी

परतलो मग शेवटी आपल्या घराला
ती म्हणाली, कोणती भाजी डब्याला ?

- अशोक नायगांवकर

couple-in-love

प्रेम...

काल पुन्हा स्वप्नात आलीस
अशीच रोज् येशील का...
स्वप्नात येउन "Kiss" घेतला
असाच रोज् घेशील का..

रोज "Matching" ड्रेस घालत
अशीच माझी आठवन काढशील का...
सारखे "Item" म्हनत मला
रोज् गुदगल्या करशील् का....
 
रोज सकाळी "Good Morning" करत
अशीच मला उठव्शील का...
उठवत मला "सोनु" म्हनत
असेच खुप प्रेम करशील् का...
 
काहीतरी बहाने करुन् फोन करत
अशीच् मला "Cartoon" म्हनशील का...
कधीतरी येउन जवळ माझ्या
मला तुझ्या मीठीत घेशील् का...

सारखे "Miss Call" देउन् मला
क्शनोक्शनी माझी आठवन काढशील का...
कधीतरी अश्रु डोळ्यातले माझ्या
जवळ घेत मला पुसशील का..

जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज
नन्तरही तेवढे करशील् का...
जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज 
नंतरही तेवढच करशील् का...

beach-love-couple-silhouette