Friday, October 4, 2013

दुनियादारी लग्नानंतरची…


किट किट वाढते दोघांत
थड थड वाजते दोघांत
कधी भांडण , कधी बॉक्सिंग
अंतर वाढते दोघांत
किट किट…


असे जरी माया तरी
भाजते अंग रागाने
सोचो तुम्हे पलभर भी
बिजली कडके जोराने
भावनांचे नाटक नको,
जीव अडकला भांडयात
किट किट …


शब्द ही तू , वाक्य ही तू
भांडणाचे कारण ही तू
जख्म भी तू , दवा भी तू
झालेल्या जखमांची पहचान भी तू
रोज नवे भय तुझे ,
वाढते टेन्शन डोक्यात
किट किट ………

Thursday, September 19, 2013

परी ग परी


परी ग परी स्वप्नात माझ्या तू येशील का
इवले इवले फुलपाखरांचे पंख मला देशील का

       काळे काळे ढग पाहून नभात
       धुंदावला मोर नाचतो डौलात
मखमली निळा चकाकणारा पिसारा मला देशील का

      नभाच्या निळ्या पडद्याआड
      सुंदरसे चंदेरी  मामाचे घर
हरणांच्या गाडीत चंदामामाच्या घरी मला नेशील का  

      दूरच्या डोंगरी झरा वाहतो
      झुळझुळवाणे गीत तो गातो
तयाच्या मंजुळ गीताची तान कंठात माझ्या भरशील का

Sunday, July 21, 2013

टिक टिक वाजते … डोक्यात…

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी
संपते अंतर झोक्यात......

नाही जरी सरी तरी
भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हे पलभर भी
बरसे सावन जोमाने
शिम्पल्याचे शो पीस नको
जीव अडकला मोत्यात......

सूरही तू तालहि तू
रुठे जो चांद वो नूर हे तू
आसू हि तू हसू हि तू
ओढ मनाची नि हुरहूर तू
रोज नवे भास तुझे
वाढते अंतर श्वासात......

टिक टिक वाजते … डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात.......

Thursday, June 6, 2013

पाऊस … माझ्या मनातला…

हा पाऊस असतो -

आपल्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहायला लावणारा ,

सळसळणारा वारा , विजांचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट,

वातावरणात एक सुखद गारवा , वेगळीच धुंदी घेऊन येणारा ,

सर्वांनाच वेडावणारा , सुखावणारा ,

सगळीकडे नवचैतन्याची उधळण करणारा ,

आपल्या टपोऱ्या थेंबांनी पानांवर दवाबिंदुंच्या मोत्यांची पखरण करणारा ,

व्यवहाराची गणितं न मानणारा ,

सगळ्या चौकटी मोडून मुक्तपणे बरसणारा ,

वेळकाळाचं कुठलंही बंधन न जुमानता मनसोक्त बागडणारा ,

कधी उग्र , विराट तर कधी सौम्य रूपाचं दर्शन घडवणारा ,

आपल्या जवळचं सर्व संचित मुक्तपणे उधळणारा ,

कधीकधी मनाला अनामिक हुरहूर लावणारा ,

बरसणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक मनात वेगळेच विचार , आठवणी , स्वप्नं जागवणारा ,

आपल्या आयुष्याशी एक वेगळंच नातं जोडणारा ,

असताना अथवा नसतानाही आपलं आयुष्य मात्र व्यापून टाकणारा ..

हे सगळं लिहितांनाच आठवांचा पाऊस मात्र डोळ्यांत कधी साचला हे कळलंदेखील नाही.

या पावसाची हि अशीही एक वेगळीच अनुभूती …..

Sunday, March 31, 2013

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे…

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Conference rooms मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mails मध्ये खुषालीची मैल शोधतो आहे

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hut चा रस्ता गाठतो
veggie crust, pepperoni कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
office मधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहेकारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे