Thursday, September 19, 2013

परी ग परी


परी ग परी स्वप्नात माझ्या तू येशील का
इवले इवले फुलपाखरांचे पंख मला देशील का

       काळे काळे ढग पाहून नभात
       धुंदावला मोर नाचतो डौलात
मखमली निळा चकाकणारा पिसारा मला देशील का

      नभाच्या निळ्या पडद्याआड
      सुंदरसे चंदेरी  मामाचे घर
हरणांच्या गाडीत चंदामामाच्या घरी मला नेशील का  

      दूरच्या डोंगरी झरा वाहतो
      झुळझुळवाणे गीत तो गातो
तयाच्या मंजुळ गीताची तान कंठात माझ्या भरशील का