Monday, March 16, 2009

परवा भेटला बाप्पा...

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं ?
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं !
पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं

हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत जिथे आहे माझी माती

इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं
कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर
भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार

य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला बाप्पा माझा.

~Deepa Kulkarni Mittimani

Tuesday, March 10, 2009

मला शेवटचा....................

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे

एकदा पाहायच तुला...

एकदा पाहायच तुला पावसात भिजताना
बरसनार्‍या थेम्बाना न्याहाळायचय तरसताना

पाउस ही हर्षेल स्पर्शाने तुझ्या
मनात उतरवीन मी निथळताना तुला

मलाही वाटेल मग एक थेम्ब व्हावासा
फक्त तुझ्या ओठावर जाउन बरसावा

न्याहाळ्ताना ओले रुप तुझे ते रती
सान्ग माझ्या मनाची समजुत घालु कशी

घेता जवळ् तुजला श्वाशात श्वास मिसळले
भरुन उरलेल्या धुक्यात मग रुधिरही उसळले

घट्ट मिठित तु जा ना विरघळुन माझ्या
पावसात लागलेल्या आगीला विझव ना जरा

तुझ्या डाळिम्बी ओठाना ओठ स्पर्शतात
वाटे भुतलावर स्वर्गच उतरला

पदर जरी असला तरी ओलेत्यातुन मोहवती
वक्ष स्थळ सुन्दर ती मला खुणवती

पावसात भिजताना पाहताना तुला
मनी इन्द्रधनु कसे नाचले कळलेच नाही मला

तुझ्या नंतर...

एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमावर,
आभार तुझे मानतो आहे,
तुझ्या नंतर मी आता,
दूसरी मुलगी शोधतो आहे..........

तू सुद्धा आता,
दूसरा कुणी शोधला असशील,
रोज रोज त्याला,
माझ्यासारखा पिलला असशील.......

तुला माहित आहे,
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो,
एक मुलीला पटवायला,
किती घाम गालावा लागतो..........

तुला लिहलेल्या प्रेम पत्रांची,
आजही आठवां ताजी आहे,
पुढचे प्रेम करायला,
माला त्यांची गरज आहे.........

आपल्या प्रेमापायी तुला दिलेले,
सर्व GIFT सुद्धा हवे आहे,
अर्ध्या किमतीत सुद्धा त्यांना,
विकत घ्यायला मी तयार आहे..........

तुझ्यावर केलेला सर्व खर्च,
आजही माझ्याकडे तयार आहे,
CHEQUE घ्यायचा की CASH घ्यायची,
यावर विचार सुरु आहे............

अरे हो..............
तुझातर माझ्यावर,
कोणताही खर्च नसेल,
कारन पर्स नेहमी घरी विसरने,
तुझे आजही सुटले नसेल........

तुझ्याकडे मी दिलेला,
माझा फोटो मला हवा आहे,
मुलीना IMPRESS करायला,
तोच तर एक दुवा आहे...........

तुझ्याकडून मिलालेल्या सर्वच वस्तुंचा,
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील,
तुला जसे PROPOSE केले होते,
तसेच मी तिला पण करीन............

म्हणुन मला माझे,
सर्व तू परत कर,
मला अजुन एक मुलगी पटवायला,
माझ्यासाठी प्रार्थना कर.........

तुझे प्रेम संपल्यावर,
दुसरे प्रेम शोधतो आहे,
तुझ्या नंतर मी आता,
दूसरी मुलगी शोधतो आहे,
तुझ्या नंतर मी आता,
दूसरी मुलगी शोधतो आहे..............

कुणीतरी आठवणं काढतय...

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

सखी...

नको धाऊस गं सखे
बेभाण होऊन या वेड्यासंगे
कधी परतुन पाहिल्यावर मग
परतीची वाटही दिसणार नाही मागे..

कुठे तरी, काही तरी घडलय
त्याचं कोणासोबत तरी बिनसलय
मग उगाचच नाही मन माझं
माझ्यापसुन दुर गेलय....

सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला....

जेवढं बांधावं काव्यात
तेवढी तु निराकार होत जातेस...
समजुन सोडवावं म्हटलं तर
आणखीनच गुंतत जातेस...

किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा...

जमलंच तर तुला,
आणखी एक जादु करुन जा...
निरोप घेताना सखे,
तु तुझ्या आठवणीही घेऊन जा ..!

तु फ़क्त हो म्हण‏

तु फ़क्त हो म्हण
तुझ्यासाठी माझ्यात बदल करुन घेइन मी
तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन मी
तुलाच सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी
तु फ़क्त हो म्हण
तु फ़क्त हो म्हण
या जगाला सुद्धा जिन्कून दाख्वेन मी
प्रेम काय असत हे दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा
तु फ़क्त हो म्हण
तु फ़क्त हो म्हण

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...