Wednesday, June 1, 2011

पहिला पाउस…पहिलं प्रेम…

एक दुपार अशीच
सरत्या मे महिन्याची
मी खिडकीपाशी वाचत बसलेले
इतक्यात चाहूल लागली पावसाची

हवेत आलेल्या गारव्याने
उन्हाची काहिली ओसरली
तळपणार्या सूर्याची
कृष्ण्मेघांनी चांगलीच जिरवली

सोसाट्याचा वारा सुटला
बटांशी माझ्या खेळू लागला
त्या अलवार स्पर्शात
त्याचा भास झाला

बघता बघता
जलधारा बरसू लागल्या
टपोर्या थेंबांनी
धरती भिजवू लागल्या

झाडपान रस्त्यासोबत
त्यांनी हवेलाही नाही सोडलं
उरात दडवलेल्या आठवणींना
हलक्या सरींनी जागवल

नकळत हातातल पुस्तक मिटल
मन भूतकाळात हरवल
ओल्या मृदगंधासोबत
आठवणींच अत्तर दरवळल

पहिल्या पावसाच
हेच तर अप्रूप असत
पहिल्या प्रेमाशी त्याच
खूप जवळच नात असत

Thursday, May 12, 2011

धुंद...

कुणाच्यातरी कविता वाचताना
त्यात दोन ओळी आपल्याही असाव्यात
त्या कविता वाचता वाचता
तिझा चेहरा डोळ्यासमोर दिसावा ...

मग आपण सुद्धा कवी होऊ पहातो
जे मनात येईल ते शब्दात उतरवू पाहतो
इतर कवींपेक्षा आपल्या कवितेत असते फक्त ती
कविता संपल्यावर राहतो तो फक्त एकटा मी

मग काय मनात ती , ध्यानात ती
हेच काय स्वप्नात सुद्धा तीच
पण स्वप्नातून बाहेर आलोकी
राहतो तो फक्त एकटा मी ....

सकाळी उठल्यावर एकच हुरहूर
तिला जाऊन भेटण्याची
स्वप्नातील सर्व काही तिला सागण्याची
ती समोर आल्यावर वेड्या सारख तिला पाहण्याची

ती समोर असताना अतिशय आनंद
तिझ्या मिठीतला तो मोहक सुगंध
मग स्वप्न सागायचं राहूनच जात

कारण,

तिझ्या बरोबरच्या काही क्षणासाठी मी असतो धुंध
धुंध या आमुच्या जगात असच रहावस वाटत
असच तिझ्या सोबत पूर्ण आयुष्य जगावस वाटत
तिझ्या सहवासतील काही क्षण अमूल्य आहेत म्हणूनच ........

तिला कायमची आपल्या मिठीत सामाऊन घ्यावस वाटत...

 

index

Saturday, April 30, 2011

मिठीत यायचं तर अशी ये

मिठीत यायचं तर अशी ये
की दुजेपणाच भान सुटावं
सुप्त मनाच्या वादळातुन
फक्त श्वासांचं रान उठावं

मिठीत यायचं तर अशी ये
की मनानं मनात विरून जावं
माझ्या श्वासाने जरा थांबुन
तुझ्या श्वासात जगुनं घ्यावं

मिठीत यायचं तर अशी ये
की अस्तित्वानं दडून जावं
नेणिवेच्या धुक्यावरती
जाणिवेनं पडून रहावं

मिठीत यायचं तर अशी ये
की क्षणांनी स्तब्ध व्हावं
खोल मनाच्या गाभा-यातुन
आत्म्यानं मुक्त हुंकारावं !!

young_couple_-_love_blog_0

स्वर टिपेचा

स्वर टिपेचा आज वेचा ! रे उद्या, फुटणार काचा !
जायचे जातील ! पाहू सोहळा ; उरतील त्यांचा !

विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या.
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा !

देहही नव्हता तपस्वी , जीवही नव्हता कलंदर…
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा…

संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी,
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर ; पावसाचा !!!

मी म्हणालो बायकोला

मी म्हणालो बायकोला, आजपासून प्रेयसी तू
ती म्हणाली, यापुढे चोरून भेटू

मी किनार्‍याचा तिला पत्ता दिला
ती बिचारी खरकटी उरकून आली

मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या
ती म्हणाली, दूध हे जाते उतू

ती म्हणाली आठवा वर्षे जुनी
मी म्हणालो, काळ सारा गोठला

रूम मित्राने दिली एकांत रात्री
ती म्हणाली राहिली पोरे उपाशी

परतलो मग शेवटी आपल्या घराला
ती म्हणाली, कोणती भाजी डब्याला ?

- अशोक नायगांवकर

couple-in-love

प्रेम...

काल पुन्हा स्वप्नात आलीस
अशीच रोज् येशील का...
स्वप्नात येउन "Kiss" घेतला
असाच रोज् घेशील का..

रोज "Matching" ड्रेस घालत
अशीच माझी आठवन काढशील का...
सारखे "Item" म्हनत मला
रोज् गुदगल्या करशील् का....
 
रोज सकाळी "Good Morning" करत
अशीच मला उठव्शील का...
उठवत मला "सोनु" म्हनत
असेच खुप प्रेम करशील् का...
 
काहीतरी बहाने करुन् फोन करत
अशीच् मला "Cartoon" म्हनशील का...
कधीतरी येउन जवळ माझ्या
मला तुझ्या मीठीत घेशील् का...

सारखे "Miss Call" देउन् मला
क्शनोक्शनी माझी आठवन काढशील का...
कधीतरी अश्रु डोळ्यातले माझ्या
जवळ घेत मला पुसशील का..

जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज
नन्तरही तेवढे करशील् का...
जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज 
नंतरही तेवढच करशील् का...

beach-love-couple-silhouette

Tuesday, March 29, 2011

एक प्रेयसी पाहीजे........

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........

मिळेल का अशी........एक प्रेयसी?

girl-dancing-rain_thumb[2]

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...