Wednesday, April 28, 2010

ती मला बेस्ट फ्रेंड मनायाची...!!!

मला वाटायचे तिच माझ्यावर जिवापाड प्रेम आहे..
फक्त मी विचारायची देरी आहे..
मलाही ती प्रचंड अवाड्याची..
जेवा ती मला आपला "BEST FRIEND" म्हणायची..
मनातले गुपित फोडायची..
लाडात येवून बोलायची..
लटक रागवायची..
माझ्याशी भांडायाची ..
गप्पा मारायची..
माझ्या कविता ऐकायची..
त्याना उस्फ़ुर्त दाद दयाची..
माझ्यावर प्रेम करायची..
पण मला माहित नवत..ती मला
फक्त आपला "BEST FRIEND"..मानायाची.

 

मला खुप यातना झाल्या जेवा ती म्हणाली..
"मी प्रेमात पडले रे त्याच्या"...
पण तिच्या अपेक्षे तेप्रमाने मी तेवा तिची थट्टा केली..
अन तिची कली लगेचच खुलावली ..
तिला काय सांगू काय नको असे झालेल.
अस तिला कितिदातरी पहिलेल..
मी म्हणालो.."मजा आहे बुआ एका मुलीची.."
ती म्हणाली "तुलापन मिलेल रे साथ कुना सुन्दरिची.."
मन रडत असतानाही हसत होत..
तिला कालू न देण्याची सगली कलजी घेत होत..
तिला पण काहीच कलले नाही..
प्रेमात पडलेल्या तिला वेगले कही दिसले नाही..
मी पण तसदी घेतली नाही मनातले कही बोलायची ..
कारन ती मला आपला " BEST FRIEND" मानायाची ..

 

ती गेल्यावर मी सुन्न झालो..
आतल्यात मग्न झालो .
तिच्या आठवणी आठवू लागलो..
तय पुसून टाकायच्या निष्फल प्रयत्न करू लागलो..
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो..
त्याच्या नावाने तिला भरपूर चिदावयाचो..
कोणाशी भंद्ल्यावर मात्र तिला माझी आठवण यायची..
आजही तिला माझ्या मध्यस्तिची गरज वाटायची ..
ती अजुनही माझ्याशी खुप बोलायची.
खुप कही सांगायचे आहे असे म्हणायची
पण कधी हे मात्र सांगायला विसरायची ..
मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत
कारन ती मला तिचा "BEST FRIEND" मानायाची..

 

मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो..
माझ्याच एक्टेपनत हरवलेला असायचो..
तिचे बोलने ऐकत असताना..
मुकपने आपले अश्रु गिलत असायचो..
तिच्यासमोर नाटक करने फारच कठिन होते..
कारन माझे मन तिच्याकडे अजुन गहन होते..
त्याच तीच भंडन ती मला येवून सांगायची.
माझ्याशी बोलूं मोकले वाटले अस म्हणायची ..
स्वतःच्या वेदना लपवून तिचे बोलने
शांतपणे ऐकून घ्यायचो
एक दोन गोष्टी सांगुन तिला बारे वाटेल असे काहीतरी संगयाचो..
माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या असन्यवाराच ती समाधानी असायची..
कारन ती मला तिचा "BEST FRIEND" मनायाची..

 

आदेमदे तिलापन काहीबाही हुक्की यायची...
कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची..
मीही हसून खोता राग दखावयाचो ..
तिच्या चिड्न्यावर खोते चिडून तिला खुश करायचो..
माझ्या वेदना अणि दुःख तिला कधी दखावलेच नाही..
एक शब्दानेही तिला कही कालू दिले नाही..
तय दिवशी त्याची अणि माझी भेट झाली..
माझी थास्थास्नारी जखम पुन्हा उघडी पडली..
तिने माझी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली..
मी भेट दिलेल्या "माझ्या कवितांची वाही त्याला दाखवली..
दुसर्याच दिवशी त्याने तिला "आपली कविता भेट दिली"..
कारन त्याला कदाचित तिच्याबद्दल asurkshitata भासली ..
तिला मात्र कधीच ह्याची भीती नाही वाटायची..
कारन ती मला तिचा फक्त "BEST FRIEND"..मानायाची..

 

तिच्या लग्नात तिने मला अवर्जुन बोलावले..
लग्नाला नक्की यायचे असे पत्रिकेत लिहून पाठवले,
माझ्या रुध्याची शंकले मीच गोला केलि..
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली..
चेहरा हसरा ठेवून मी कालजी घेतली तिला खुश ठेवायची .
कारन ती मला तिचा "BEST FRIEND" मनायाची..
तिच्या लग्ननतर मी एक गोष्ट केलि.
कटाक्षाने तिची भेट टालली..
माझ्या वागन्यताला फरक तिला कलुन द्याचा नवता..
कारन त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माझ्या अश्रुंची मुलीच कदर नवती..
मी इतके दिवस असे कही दखाव्लेच नाही..
कारन ती मला तिचा "BEST FRIEND " मनायाची...

 

आयुष्यभर एकटा रहूँ जगत आलो..
तिच्या पत्रांना जनून बुजुन एक दोन ओलित उत्तरे लिहू लागलो..
माझ्या busy lifecha चांगला बहाना माझ्याकडे होता..
तिच्याही व्यपंमुले तिला अजिबात वेळ नवता..
तरीही माझ्या एक दोन ओलीना ती उत्तरे पठावायाची..
कारन ती मला तिचा "BEST FRIEND" मनायाची...
तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो..
इतके दिवस थाम्ब्लेल्या अश्रुन्सकत बोललो ..
शेवटचा घटका मोजताना तिला फार बोलावले नाही..
तरीही एक वाक्यात तिने मला सांगितले..
" तू आतापर्यंत खरे मित्रत्व दाखवले ..
दोल्यानिच ती म्हान्याचे ते म्हणाली..
ती मला तिचा "BEST FRIEND" मनायाची..

 

आता माझाही प्रवास संपत आला आहे..
मागे बघताना त्या हिर्वलीचा हेवा वाटत आहे..
आताच पोस्टमन येउन हे पार्सल देवून गेला..
माझ्या मानत प्रश्नाचे कहर माजवुन गेला
काय गरज होती का तिला तिच्या मृतुपत्रात
आवर्जुन माझ्यासाठी कही ठेवायची ..
पण नाही ..कारण..
ती मला तिचा "BEST FRIEND" मनायाची..
तिच्या डायरी मधे मला सापडले ..
माझे हरवलेले क्षण , आठवणी..खोड्या.. थट्टा..हसने..बोलने..रदने..गुपित गोष्टी..गाठी..भेटी..मैत्री अणि बरेच काही..अणि पटत गेले..
खरच ती मला तिचा "BEST FRIEND " मनायाची...

 

व्हा शेवटच्या पानावरच्या तिच्या ओली वाचल्या .
रुध्यात्ल्या अश्रुना जणू वाटा मोक्ल्या झाल्या..
"मला वाटते त्याच माझ्यावर जिवापाड प्रेम आहे..
फक्त त्याने मला विचारायची देरी आहे ..
मला तर तो प्रचंड अवाड्तो..
मी त्याला "BEST FRIEND " म्ह्न्त्ल्यावर..
गालातल्या गलत हस्तो..मनातले गुपित सांगतो..माझे ऐकतो...माझ्याशी भांडतो..
त्याच्या कविता ऐकवून , माझ्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकतो...माझ्यावर प्रेम करतो..
खर्च का तो माझ्यावर खरे प्रेम करतो..??????
जणू माझ्याच ओली मी तिच्या डायरीत वाचत होतो..
मरन्यापुर्विच सरणावर जलत होतो..
काय गरज होतो मरण शय्येवर नियातिनेही
माझी अशी क्रूर थट्टा करायची..
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून दयाची.. की
वेड्या , ती तुला तिच "TRUE LOVE" मानायाची...!!!

Monday, April 19, 2010

नामंजूर

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर !
अन्‌ वा-याची वाट पाहणे - नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर !

मला ऋतूंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा !
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर !

माझ्या हाती विनाश माझा ! कारण मी !
मोहासाठी देह ठेवतो तारण मी !
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अश्रूचे थिटे बहाणे - नामंजूर !

रुसव-फुगवे ..... भांडणतंटे ..... लाख कळा
आपला-तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन्‌ घ्यावी
गगनाशी नेणे गाऱ्हाणे - नामंजूर !

नीती, तत्वे ..... फसवी गणिते ! दूर बरी !
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी !
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे - नामंजूर !

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....
तरी उणं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

Wednesday, April 7, 2010

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..


कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...


नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा
पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना

त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा
कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............!


पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा.............!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!

एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,
होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा........

Thursday, April 1, 2010

तू विसरु शकशिल का?

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का?