Tuesday, November 29, 2011

सहज एक दिवस...

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून... ...

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्‍याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवा य
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत

मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?

Girl_boy_love1

Sunday, November 27, 2011

सलाम...

मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम...
हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम...
बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम...
तिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम...
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम...
सागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला सलाम...
कोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम...
सीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम...
शहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम...
जाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्‍या लास्ट बुलेटला सलाम...
हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम...
त्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम...
मुंबईवर हल्ला करणार्‍या पाकिस्तानला सलाम…
पुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्‍या आपल्या नेत्यांना सलाम...
हल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्‍या त्यांच्या नेत्यांना सलाम...
हल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्‍याला मीडीयाला सलाम…
त्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम...
वर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्‍या प्रत्येकाला सलाम...
कोरडे अश्रू ढाळणार्‍या लोकांना सलाम…
शहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्‍या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम...
कसाबला जिवंत पकडणार्‍या पोलिसांना सलाम..
त्याला पोसणार्‍या आपल्या सरकारला सलाम…
त्याला फाशी देणार्‍या आपल्या न्यायदेवतेला सलाम…
त्याला सुधारू द्या असा म्हणणार्‍या मानवाधिकार समितीला सलाम..
बॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्‍यांना सलाम…
मृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्‍या वृत्तपत्राला सलाम..
पोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्‍याला सलाम..
उद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्‍याला सलाम…
फेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम...
कमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम...
कॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..
सगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..
ज्यांना सलाम करायचा राहिला त्या सगळ्यांना सलाम..
गांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…
लाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..
सलाम तुम्हा सर्वांना सलाम… ... सलाम तुम्हा सर्वांना सलाम… !!

~सुहास झेले