Tuesday, March 10, 2009

तु विसरु शकणार नाहीस...........!

तु विसरु शकणार नाहीस
नदीचा काठ, चमचमतं पात्र
उतरता घाट, मोहरती गात्रं

तु विसरु शकणार नाहीस
कलंडता सुर्य, लवंडती सांज
पक्षांच्या माळा, किणकिणती सांज

तु विसरु शकणार नाहीस
सोनेरी उन, वा-याची धुन
पावलांची चाहूल, ओळखीची खुण

तु विसरु शकणार नाहीस
दिलेला शब्द, ओझरता स्पर्श
दडलेले प्रेम, ओसंडता हर्ष

तु विसरु शकणार नाहीस
हातात हात, अन् तुझं माझं हितगुज
आंब्याच्या झाडावर, चिमण्यांची कुजबुज

तु विसरु शकणार नाहीस
भिजलेले डोळे, विरलेली स्वप्नं
भिजलेली वाट, उरलेले प्रश्न
तु विसरु शकणार नाहीस

आणि मी ही विसरु शकणार नाहीस.

No comments:

Post a Comment