Tuesday, March 10, 2009

सखी...

नको धाऊस गं सखे
बेभाण होऊन या वेड्यासंगे
कधी परतुन पाहिल्यावर मग
परतीची वाटही दिसणार नाही मागे..

कुठे तरी, काही तरी घडलय
त्याचं कोणासोबत तरी बिनसलय
मग उगाचच नाही मन माझं
माझ्यापसुन दुर गेलय....

सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला....

जेवढं बांधावं काव्यात
तेवढी तु निराकार होत जातेस...
समजुन सोडवावं म्हटलं तर
आणखीनच गुंतत जातेस...

किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा...

जमलंच तर तुला,
आणखी एक जादु करुन जा...
निरोप घेताना सखे,
तु तुझ्या आठवणीही घेऊन जा ..!

No comments:

Post a Comment