Tuesday, March 10, 2009

माझ्या अंतरीचे बोल

माझ्या अंतरीचे बोल तुला कळणार नाही
आता तुला माझे शब्द कधी छळणार नाही !

खूप लिहिले तुजसाठी तरी तुला उमजेना
आता तुझ्यासाठी अश्रू कधी ढाळणार नाही !

किती काळ गेला माझा फक्त तुझ्या प्रतीक्षेत
आता मात्र तुझ्यामागे अशी पळणार नाही !

तुझ्यासाठी मनातली प्रित अबोल राहिली
आता भेटलास तरी काही बोलणार नाही !

तुझ्या - माझ्यातली दरी अशी वाढत जाईल
त्याला जोडणारा सेतु मात्र बांधणार नाही !

पैलतीरावर आला मूक भावनांचा थवा
तुझ्या निघून जान्याने तोही थांबणार नाही !

तुझ्या आठवांचे सडे माझ्या दारी सांडतील
पण मनी आले तरी तुला भेटणार नाही !

सुख लोळेल पायाशी तेव्हा विसरून जाशील
तुझ्या सुखावर मात्र कधी जळणार नाही !

No comments:

Post a Comment