आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .
आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .
आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .
आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.
आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिलसिला
Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई, अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.? तुम न यहाँ से कटती, न तुम वह...

-
आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही सारे प्रहर आपले शहर गर्दीचा कहर त्या गर्दी...
-
संध्याकाळचा पाऊस मला........... संध्याकाळचा पाऊस मला गाणं गायला सांगायचा माझे गाणे ऐकून त्यातले चार शब्द मागायचा मी शब्द दिल्यावरती पाऊस अगद...
-
Bright star, would I were stedfast as thou art— Not in lone splendour hung aloft the night And watching, with eternal lids apart,...
No comments:
Post a Comment