Tuesday, May 4, 2010

तुझे माझे नाते

तुझे माझे नाते आता मलाच कळत नाही....
शब्दात पकडू म्हणले तर शब्दच मला कळत नाहीत...
प्रत्येक तास, प्रत्येक मिनट...
आता फ़क्त विरहाचाच आठवतो....

विसरुन जाउ म्हणले तर अश्रु बनुन ओघळतो....
तुझा भास आता जाणवत रहातो मनाच्या प्रदेशात....
पकडू म्हणले तर सगळा प्रदेश उजाड दिसतो....

आता फ़क्त मी तुझ्यासाठी एक दिवा लावू शकतो...
आणि विझताना त्या दिव्यात आपले प्रेम बघु शकतो

No comments:

Post a Comment