Monday, February 14, 2011

सखी

सखी तू मोगर्‍याची दरवळ मनभर,
कधी पास कधि भास,क्षणोक्षण रोमांचित..............

सखी तू प्राजक्ताचा मोहमयी सडा,
ओंजळीत साठलेला स्वप्नचांदणचुरा..................

सखी तू ग्रिष्माचा बहर बहावा,
जगण्याच्या ऊर्मिचा उन्मेष आगळा................

मध्यन्ही डोलणारा तू शिरिष डोलारा,
तळपत्या वाटेवर मायेचा विसावा.................

गच्च-रानी फुललेली उक्षीची तू वेल,
मनातला खोलवर स्नेहाचा पाझर.................

फुलाकळ्यांचा लोभसवाणा सखी बहर हा तुझा,
रंग-गंध त्यांतले वेचणारा मी कवी वेडा.................

Friend


No comments:

Post a Comment