Thursday, December 13, 2012

प्रेम…

काही काळ असाच गेला होता...
सारेकाही पडद्याआड गेले होते...
आता कधीच प्रेम करणार नाही....
असे निश्चयाने ठरविले होते....

पण असे काय घडले की....
ठाम निश्चय हि विरून गेला....
इतका धृड असूनही तो....
मनातल्या मनातच राहून गेला....

त्या दिवशी अचानक अनपेक्षित असे काही घडले होते....
काय होते ते ह्याचे उत्तर त्या दोघांच्या मनात
अन काळाच्या पडद्याआड दडले होते....
दोघांच्याही मनात खुप अन खूपच प्रेम
बरसले होते....

पण कसल्याश्या ओझ्याखाली ते
अखंडपणे दबले होते....
जरी शरीरे साथ देत नव्हती
कारण कर्तव्ये आड येत होती....
तरी त्यांच्या मनाने
एकमेकांसाठीच जगायचे असे ठरविले होते....
असेच काही दिवस गेले....

एकाचे खंबीर होते पण दुसऱ्याच्या मनात
संशयाचे बीज उगविले....
पाहता पाहता अबोला आला
दोघांमधला दुरावा वाढत गेला....
संशयाच्या धुरामुळे खरे प्रेम झाकून गेले

दोघांच्या मनातले प्रेम मनातच राहून गेले....
संशयाच्या वजनापुढे मनाचे काही चालत नसते
ह्या दोघांच्या घोर युद्धात बिचारे हृदयच नेहमी मरत असते....
एकमेकांत गुंतताना आधीच विचार करायचा असतो....
नाहीतर आपल्या अशा वागण्यामुळे...

दुसऱ्याचा जीव जात असतो....
दुसऱ्याचा जीव जात असतो....

No comments:

Post a Comment