Tuesday, August 3, 2010

ती आणि पाऊस ...

उन्हाळ्याने त्रस्त झालेले आपण दरवर्षी पावसाची वाट बघतो, कधी आढे-वेढे घेत, कधी अचानक येत आपली तारांबळ उडवून देत तो दारावर थबकतो... मग इतके दिवस एकलकोंड्या झालेल्या छत्र्या त्याच्या स्वागताला बाहेर येतात. पहिल्या पावसात हिरव्यावरची मळभ धुऊन निघते आणि निसर्गाची कांती नवतेजाने उजळते.

पहिल्या पावसाच्या येण्याने चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं, इतिहासाच्या वह्यामधून निघुन पानांच्या होड्या वर्तमानाच्या शर्यतीत वहायला लागलेल्या असतात.

ईकडे त्याच्या-तिच्या भांडणाला पूर्णविरामाचं कारण मिळालेलं असतं. उसळलेल्या लाटांसोबत राग कधीचाच वाहून गेलेला असतो, मग शब्द काहीच बोलत नाहीत. तो तिचा हात अलगत आपल्या हातात घेतो आणि सगळे रंग बदलून जातात.

पावसाची ही गंमत मी मात्र खिडकीत उभा राहूनच बघतो, कानांवर पडणारे थेंबाचे आवज टिपत चहाचे गरम घोट मिटक्या मारत पितो, न सांगता हिलाही माझ्या मनातलं कळतं, ती गरम भज्यानी भरलेली बशी घेऊन बाहेर येते, अशावेळी त्या भज्यांपेक्षा मला ती जास्त खुसखुशीत वाटते. मी काहीच बोलत नाही..

तिची नि माझी पावसातली पहिली भेट मला आठवते आणि तिच्याकडे पाहून मी फक्त हसतो,
मन म्हणतं थांबलास का वेड्या... पहिला पाऊस एकदाच येत असतो....

girl-in-rain

No comments:

Post a Comment

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...