Tuesday, February 1, 2011

प्रेमात पडल्यासारखं वाटतं....

वाऱ्याच्या तालावर केस तुझे नाचताना
माझ्यातलं प्रेम गीत गायल्यासारखं वाटतं

तुझ्याबरोबर आज जे जगतो ते जीवन
मी स्वप्नात कधीतरी पाहिल्यासारखं वाटतं

संध्याकाळी तुला हसताना पाहिल्यावर
दिवसभराचं दु:ख हरवल्यासारखं वाटतं

मी घेऊन येतो फूल तुझ्यासाठी, पण
तुला पाहून फूल लाजल्यासारखं वाटतं

तुझा हात हातात घेऊन चालताना
हे जीवन जगल्यासारखं वाटतं

मिठीत तुझ्या मी विरघळताना
मला घर सापडल्यासारखं वाटतं

वारा तुझ्या अत्तराचा सुगंध घेऊन आला की
पून्हा तुझ्या प्रेमात पडल्यासारखं वाटतं

तू हसून, मला 'वेडा' म्हणालीस की
मी फक्त तुझाच असल्यासारखं वाटतं

तुझ्या डोळ्यातून स्वत:ला पाहताना
मला उगीच 'महान' झाल्यासारखं वाटतं

No comments:

Post a Comment