Tuesday, July 10, 2012

मन वेडुलं वेडुलं...

मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...
जीवनात चालू आलं... माझ्या प्रियेचं पाऊलं...

रिक्त चौकट भरली... सारी सारुनिया धूळ...
गहिवरला गाभारा... असं सजलं राउळं...

... मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!
ओढ लागली जीवाला... जणू पडली भुरळ...

मोहोरला रानोमाळी... एक विरक्त बकुळ...
रोमी शहारे उठवी... तिच्या आठवांचे खूळ...

स्पर्शभासाने फुलली... गोड गुलाबांची फुलं...
मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!

को-या आकाशी दाटली... गर्द ढगांची झाकोळं...
टपोर थेंब टिपायला... मनचातक व्याकूळ...

गर्दी जाहली स्वप्नांची... आतुरलं स्वप्नांकुल...
दारी उंबराही झाला... तिच्या स्वागता काकुळं...

मन वेडुलं वेडुलं
... त्याला लागली चाहूलं...!

No comments:

Post a Comment