नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो
नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन् चंद्र पोरका होतो
येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो
तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो
ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिलसिला
Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई, अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.? तुम न यहाँ से कटती, न तुम वह...
-
पांघरूणातून दिवसाचा प्रकाश आत शिरला, तेव्हा ती चमकून जागी झाली. पांघरूण भिरकावून ती ताडकन उठून बसली. गजराच्या घड्याळावर थपडा देत तिनं दोन-च...
-
स्वर टिपेचा आज वेचा ! रे उद्या, फुटणार काचा ! जायचे जातील ! पाहू सोहळा ; उरतील त्यांचा ! विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या. चुंब...
-
मुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम... हॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम... बोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम.....
No comments:
Post a Comment