उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही
सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?
लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या ?
बाळाचें मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,
- कुसुमाग्रज
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिलसिला
Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई, अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.? तुम न यहाँ से कटती, न तुम वह...

-
आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही सारे प्रहर आपले शहर गर्दीचा कहर त्या गर्दी...
-
एक विनंती आहे ..... दुरच जायच असेल तर जवळच येऊ नका, busy आहे सांगुन टाळायाच असेल तर वेळच देऊ नका...... एक विनंती आहे .......
-
Bright star, would I were stedfast as thou art— Not in lone splendour hung aloft the night And watching, with eternal lids apart,...
No comments:
Post a Comment