Monday, December 13, 2010

प्रीतीचं झुळझुळ पाणी

प्रीतीचं झुळझुळ पाणी, वा-याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी
हा जीव वेडा होई थोडा थोडा, वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा, चल प्रेमाचा रंगू दे विडा
साजणा तुझी मी कामिनी
मी धुंद झाले मन मोर डोले, पिसा-यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे - खुळी मीच झाले, स्वप्न फुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी
ही तान नाचे आसावरीची, मांडी नव्हे ही उशी सावरीची
सोबत लाभे मला ही परीची, किती स्वाद घेऊ सरेना रुची
सजना वेळ का मिलनी

गीत - मुरलीधर गोडे
संगीत – ऋषिराज
स्वर - उषा मंगेशकर,  शैलेंद्र सींग
चित्रपट - बन्याबापू (१९७७)

No comments:

Post a Comment

सिलसिला

Beautiful song with Income Tax Lyrics मैं और मेरी कमाई,  अक्सर ये बातें करते हैं, टैक्स न लगता तो कैसा होता.?  तुम न यहाँ से कटती,  न तुम वह...